Tuesday, April 26, 2011

चारोळ्यांचा पाचोळा


झाली पहाट
तरी धुके दाट
पहावी वाट
येण्याची तिच्या

आता वेशीवर
हृदयाची लक्तरं
कशाला लवकर
यावे तिने?

गेला गेला दिवस
आता एकच आस
संध्याकाळ उदास
होऊ नये

आली शुक्राची चांदणी
गंधाळली रातराणी
माझ्या विश्वाची राणी
आली की काय?

मनाचा पिसारा
अंगभर शहारा
तिला विचारा
काय करू?

- यशोधन

No comments:

Post a Comment