सांगा तिला, राहू दे म्हणावं इथेच तुझा पसारा
तोही घेउन गेलीस तर कशासाठी जगायचं?
कुणाच्या आयुष्यातून निघून जायचंच असेल
तर किमान पाउलखूणा तरी राहू द्याव्यात
तुझ्या पावलांच्या सोबती शिवाय पाउलवाट सरत नाही
कुणाच्या आयुष्यातून निघून जायचंच असेल
तर आपल्याच रंगांचे पापुद्रे काढून नेवू नयेत
तुझे रंग मिसळल्या शिवाय संध्याछाया विरत नाही
कुणाच्या आयुष्यातून निघून जायचंच असेल
तर काही सूर मागेच विसरून जावेत
तुझे सूर जुळल्या शिवाय आता विराणीही रंगत नाही
नक्षीकाम करणार्याने भिंतीचा पक्केपणा पाहू नये
जगण्याची ईच्छाच जिवंत राहण्याला जगणं बनवते
खूप आयुष्य असणार्यापेक्षाही भाग्यवान असणारा एकच
तुला कळलंच असेल कोण ते..
No comments:
Post a Comment