सांगा तिला, घेउन जा म्हणावं तुझ्या आठवणींचा पसारा
अजून किती वेळा मी उगाचच अडखळून पडायचं?
कुणाच्या आयुष्यातनं निघून जायचंच असेल
तर उगाच पाउलखूणा वगैरे ठेवायच्या भानगडीत पडू नये
त्यांच्या बाजू-बाजूनं माझ्या पावलांची कल्पना करायचा मोह आवरत नाही
कुणाच्या आयुष्यातनं निघून जायचंच असेल
तर आपले सगळे रंग न विसरता सोबत न्यावेत
नाहीतर नवे रंग बसत नाहीत आणि जुन्यांसोबत येणारा आठवांचा डोह सावरत नाही
कुणाच्या आयुष्यातनं निघून जायचंच असेल
तर सोबतीचे सगळे सूर विरून गेल्याची खात्री करावी
आधीच अवरोहांच्या या उतारावर घरंगळताना आजकाल आरोह सापडत नाही
उगाच मातीच्या भिंतीवर फार नक्षीकाम करू नये
फारसं आयुष्य बाकी नसणार्याला जगण्याची इच्छा देण्यासारखा गुन्हा नाही
फार आयुष्य शिल्लक नसण्यार्यापेक्षाही दु:खी असणारा एकच -
आयुष्यात फारसं काही शिल्लक नसणारा..
No comments:
Post a Comment