Monday, June 27, 2011

The Gift


To give this topic a typical predictable start – all of us, at some point of our lives have taken and given the gifts. Different occasions, different people and different gifts. Gifts could range from a pen to a honeymoon package. From a paperweight to a house. From a movie ticket to a car. Anything.

But hey, this is not a guide about “what to gift your grand-mom at her 88th birthday”! Or not even some personal experience of mine about “how I got the most amazing gift of my life”. This is just about a place of gift in our lives.

A show-piece or a daily utensil, we always value a gift on the hands giving it to us. Surprise or not, the gifts make us excited and anxious. If you really want to know your deepest feeling about someone, recall what you hoped was there in the wrapped gift pack he or she held on your birthday.

But gifts also represent our life. Yes, they really do. Life is like giving and receiving gifts. Sometimes they are surprise gifts, sometimes expected. Big and small, costly and not so costly, even good and bad! But most importantly, life is all about opening the gifts. Once opened, no matter what’s inside, we lose  interest. It’s the process which makes results valuable.

Wednesday, June 15, 2011

Loving the Perfection


I see everyone is in search for perfect partners. They want him/her good-looking, fair, well-mannered, educated, intelligent, matured and so on. Often, we hear them asking for contradictory things. They want somebody sincere but fun-loving, strong but tender, matured but mischievous, tough but sensitive etcetera. I believe movies, especially Bollywood movies and Internet has played a major role in this. Because in those worlds, everything is so perfect. They look good, learn good, earn good, think good, do good and end good. We have gone to such an extreme in this mentality that the ideal human figures we imagine are almost impossible to occur naturally.

But, that is not the issue. It’s your choice what you want to chase. But have you ever thought the after effects? Have you ever thought that the perfect humans often act like machines? That they can be so predictable? That we also need faults and mistakes to love somebody? That sometimes, deficiencies and disabilities are your strongest allies?

When you start with unnecessary high degree of perfection (or with such a perfectionist) you may know in advance where you will end-up. This not only kills the fun, but also denies the unlimited possibilities. Not only professionally, but also socially. Would you like to be in a relationship with no ups and downs? Would you like to play with perfect kids who don’t scream or break stuff or jump in dirt? Perfection stops you from being adventurous or taking risks. Perfection always underperforms. We all may think that we love the stars on screens, but that’s not true. After all, accepting each other with their shortcomings is love, right?

I may not have expressed myself in fully correct way here. But hey, when did I say I am perfect?

Saturday, June 11, 2011

चुकतं कुठे?



राजकारण ही गोष्ट वरवर पाहता कितीही सोपी वाटत असली, तरी ती तशी नाही आणि कधीच नव्हती. या खेळातले खेळाडू सतत बदलत असतात, आणि नियमही. कारण जनता नावाच्या अंपायरलाच मुळात आपल्याला नेमकं काय हवंय हे कळत नसतं. मग जो खेळाडू या अंपायरला "तुम्हाला हेच हवंय, आणि ते माझ्याकडेच आहे" हे पटवून देण्यात यशस्वी होतो, सरशी त्याचीच होते.

आताच येउन गेलेल्या आणि अजूनही पडझड चालू असलेल्या 'रामदेवबाबा विरूद्ध सरकार' या वादळाबद्दल मी बोलत आहे. थोडासा विचार केला तर राष्ट्रीय पातळीवरचे म्हणवणारे नेते आणि स्थिरचित्त म्हणवणारे योगगुरू प्रत्यक्षात किती अविचाराने वागतात हे दिसून येईल. मीडीया ने काय दाखवलं यापेक्षा पडद्यामागे काय झालं हे जाणून घेणं जास्त रोचक ठरेल. कालानुक्रमे घडलेल्या गोष्टींकडे पाहिल्यास सर्व संगती लागत जाते.

रामदेवबाबा राजकारणात उतरण्याचा तयारीत लागले होते. तसे संकेतही त्यांनी द्यायला सुरूवात केली होती. अध्यात्मातून प्रसिद्धी आणि आदर कमविणार्‍या या माणसाला राजकारणाच्या चिखलात उतरण्यासाठी द्यावे लागणारे कारण आणि तो प्रवेश गाजवण्यासाठी एका मुद्द्याची नितांत गरज होती. आणि भ्रष्ट्राचार हा असा मुद्दा होता जो दोन्ही कसोट्यांवर उतरत होता. म्हणून काळ्या पैशाविरूद्ध घोषणा देण्याला सुरूवात झाली. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करा अशा बालीश पण जनसामान्यांच्या पसंतीला उतरणार्‍या मागण्या करण्यात आल्या. बाबांची पब्लिसीटी टीम कामाला लागली आणि हळूहळू वातावरण तापू लागले.

पण मध्येच अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना अण्णा हजारे नावाचा आतपर्यंत राज्यपातळीवर असणारा समाजनेता राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या विरोधात भ्रष्ट्राचाराचाच मुद्दा घेउन उभा ठाकला. इतका कळीचा मुद्दा आपल्या हातून निसटतोय म्हटल्यावर बाबांची तारांबळ उडाली. संपूर्ण राजकीय भविष्यच त्यावर अवलंबून होते. हा मुद्दा हायजॅक होवू देउन चालण्यासारखे नव्हते. मग घाईघाईने बाबा अण्णांच्या बरोबरीने आखाड्यात उतरले.

हे आंदोलन यशस्वी ठरले याची काही कारणे होती. आणि त्या कारणांमधे बाबा कुठेच नव्हते. पहिलं कारण म्हणजे अण्णांना असणारा राजकारण्यांचा आणि चळवळींचा अनुभव. आपल्या विरोधात काय होउ शकते आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे अण्णांना उमगलं होतं. त्यांची तयारी पूर्ण होती. दुसरं म्हणजे केंद्र सरकारला अशा आंदोलनाची सवय नव्हती. शिवाय अण्णांचा इतीहास आणि वैयक्तिक आयुष्य त्यांच्या बाजूने होतं. राजकारणाशी संबंध नसल्याने आंदोलनाला राजकीय रंग देणंही शक्य नव्हतं. मागण्याही रास्त होत्या. यामुळे आंदोलन यशस्वी झालं आणि अण्णांचा टीआरपी खूप वाढला. विदेशी मीडीयातूनही अण्णांवर चर्चा व्हायला लागल्या.

रामदेव बाबांना हा मार्ग फारच सोपा झाल्यासारखा वाटू लागला. अण्णांनी घालून दिलेले उदाहरण पुढे गिरवायचे आणि "देशाच्या भल्यासाठी भगवी वस्त्र पांघरूनही राजकारणात करावा लागणारा प्रवेश" जाहीर करून टाकायचा की झालं. त्यामुळे बाबा बेसावध राहीले. शिवाय बाबांच्या बाबतीत वर उल्लेखलेल्या सगळ्या बाजू लंगड्या होत्या. राजकारण प्रवेश आधिच जाहीर करून टाकल्याने सरकारही आता त्यांना शत्रूच्या दृष्टीने पाहणार होतं. आणि पर्यायाने साम-दाम-दंड-भेद काहीही वापरताना मागे हटणार नव्हतं. अण्णांच्या वेळी तोंड पोळल्यामुळे सरकार सावध होतं, तर अण्णांच्या यशामुळे बाबा बेसावध.

सरकारने सापळा रचला. भव्य स्वागताने बाबा हुरळून गेले. स्वत:हून अडकत गेले. सरकारने वातावरण तापू दिलं आणि ऐन क्लायमॅक्सच्या वेळी बाबांच्या सगळ्या मागण्या मान्य असल्याचं सांगून आंदोलनातली हवाच काढून घेतली. अशा प्रकारे हीट विकेट दिल्याने बाबांच्या बोलींगला अर्थच उरला नाही आणि सरकारची प्रतिमा थोडी-फार उजळली. मात्र या अनपेक्षीत परीस्थितीमुळे बाबा गोंधळले आणि चुका करत गेले. सरकारला हवं होतं त्याच पद्धतीने वागत गेले. युद्धाला सुरूवात झाली. मात्र आता सरकार गाफील झाले. समोरून येणारा फूलटॉस बॉल पाहून बॅट्समनने अती जोर काढायचा प्रयत्न करावा आणि अलगद हाती झेल द्यावा तसं झालं. मध्यरात्री झालेली कारवाई हा असाच झेल होता. मात्र अनुभवहीन बाबा आधीच्याच धक्क्यातून सावरले नव्हते. सरकारच्या प्रत्येक खेळीला शेवटची खेळी समजत राहीले आणि बेसावध सापडले.

सरकारने या सगळ्या भानगडीत एकाच दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला करून जनतेचे लक्ष विचलीत करणे, बाबांचा राजकीय काटा काढून भविष्यातील स्पर्धक संपविणे आणि अशा प्रकारच्या आंदोलनांना तात्पुरता तरी पायबंद घालणे. मात्र या परीक्षेत त्यांना तीन पैकी दोनच गुण मिळाले ते मध्यरात्री कारवाई करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे. तिसर्‍या उद्दीष्टामध्ये अर्धवट यश आले होते, मात्र झालेल्या बदनामीने ते पुसले गेले.

आता बाबांच्या राजकारण प्रवेशाची शक्यता अत्यंत धूसर झाली आहे. शिवाय त्यांच्या आध्यात्मिक साम्राज्यालाही सुरूंग लागण्याची चिन्हे आहेत. मनमोहन सिंगांची प्रतिमा डागाळली आहे. त्यांच्या नावावर निर्णय खपवले जात असले तरी नियंत्रण त्यांचे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आणि सध्या तरी अण्णा एकमेव नायकाच्या रूपात उरले आहेत. मोठ्या नावांच्या या खेळात एका महत्वाच्या मुद्द्याचा मात्र खेळखंडोबा झाला आहे.