Friday, July 27, 2012

परत एकदा..


माझ्या मना सांग तिला
माझ्या मनी राहू नकोस

झुकवून तुझी नजर अशी
माझ्या मनात पाहू नकोस

किंचित वर तुझी नजर
घेऊन का बघतेस मला?

माझं अंतर धर्तीवर
पाउल पुढे घेऊ नकोस

धूळमाती, हिरवी पाती
सगळं सगळं देईन तुला

सांजराती तेलवाती
उजेड घेऊन जाऊ नकोस..

-यशोधन