Friday, October 21, 2011

..


रिते रिते मन
  तुला भेटल्यापासून
  जसे वाचलेले सारे
  कुणी जावे विसरून

आता अंतरात माझ्या
  
गच्च आभाळ भरून
तुझ्या होकाराची वाट
  बघ पाहतो दुरून
तोड बंध सारे
  जाऊ दे पाऊस पडून
  कशी होशील हिरवी
 थोडी भिजल्यावाचून?
-यशोधन